NGN News
Latest Marathi News

अनुभव-युवा ऊर्जा संगमातून औद्योगिक विकासाचा ‘निमा’ कार्यकारिणीचा संकल्प

  • अध्यक्ष आशिष नहार यांच्याकडून 2026–2027 या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या 2026–2027 या कार्यकाळासाठीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केली आहे. नव्या कार्यकाळात उद्योजक व कामगारांच्या हिताचे विविध उपक्रम राबवून निमा अधिक सक्षम व गतिमान करण्याचा निर्धार यावेळी अध्यक्ष नहार यांनी व्यक्त केला.

दि. 30 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी आशिष नहार यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली होती. तसेच उपाध्यक्षपदी किशोर राठी व मनिष रावल, मानद सचिवपदी राजेंद्र अहिरे, मानद कोषाध्यक्षपदी राजेंद्र वडनेरे, तर सहसचिवपदी किरण पाटील यांचीही पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. याच सभेत उर्वरित कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने सर्वांशी सविस्तर संवाद व विचारविनिमय करून समितीच्या बैठकीत अनुभवी व युवा ऊर्जेच्या सदस्यांच्या संगमातून औद्योगिक क्षेत्रातील विविध तज्ञांचा समावेश कार्यकारिणीची निवड करताना करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष आशिष नहार यांनी दिली.

नव्या कार्यकारिणीत सदस्य म्हणून मिलिंद राजपूत, नितीन वागस्कर, सुधीर बडगुजर, हर्षद ब्राह्मणकर, सचिन कंकरेज, अखिल राठी, कैलास पाटील, राजेंद्र कोठावदे, किरण वाजे, वैभव नागसेठीया, आदित्य गोगटे, कैलास आहेर, किरण जैन, प्रवीण वाबळे आणि शशिकांत नवले यांचा समावेश आहे.

तर समीर पटवा, नितीन आव्हाड, रवींद्र झोपे, हर्षा फिरोदिया, मितेश पाटील, एस के नायर, मोहन सुतार, मंगेश गांधी, शरदचंद्र टर्ले हे लघू व मध्यम उद्योग गटातून तर मोठ्या उद्योग गटातून हेमंत राख, सुरेंद्र मिश्रा व अनिल मंत्री यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

लवकरच विविध विषयांवर समित्यांची स्थापना करण्यात येणार असून, नाशिकला औद्योगिक विकासाच्या बाबतीत देशात अग्रस्थानी नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न केले जातील, असे अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले. या निवडीचे उद्योगजगतातून स्वागत होत असून निमाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.