शिन्देसेना सर्वात मोठा पक्ष; भाजपबाबत उलटफेर; विरोधकांचा धुव्वा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यात्तील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महापालिका यादीमध्ये समाविष्ट असलेल्या नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठी आज (दि.१५) मतदान पार पडले. शहरातील 31 प्रभागांमध्ये एकूण ७३५ उमेदवारांनी नशीब अजमावत मतदारांना साद घातली. महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे पक्षाला सर्वाधिक ५५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे ‘शंभर प्लस’ चे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भाजपला ५२ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
एक्झिट पोल नुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना (उबाठा ) यांना प्रत्येकी ५ ठिकाणी यश वर्तवण्यात आले आहे. मनसेला दोन जागांवर यश दाखवण्यात आल्या आहेत.
मालेगावमध्ये ‘एमआयएम’ मोठा भाऊ
दरम्यान, मुस्लीम बहुल मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांसाठीचा एक्झिट पोल देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, ओवेसी बंधूंच्या ‘एमआयएम’ ला सर्वाधील २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपला ८, शिवसेनेला १५, कॉंग्रेसला ३ तर इतरांना ३२ जागा दाखवण्यात आल्या आहेत. धुळे महापालिकेत भाजप आणि शिवसेना तर जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे एक्झिट पोलची आकडेवारी सांगते.
Comments are closed.