NGN News
Latest Marathi News

सटाण्याचे माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ काळाच्या पडद्याआड

  • हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवली; बागलाण तालुक्यावर शोककळा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सटाणा : श्रीकांत रौंदळ

सटाणा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा हॉटेल आपले उपकार चे संचालक विजयराज ( आबा) किसनराव वाघ(६७) यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सटाणा शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजयराज वाघ हे मनमिळावू स्वभावाचे तसेच सामाजिक व लोकाभिमुख असे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. या माध्यमातून गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्सव अशा संस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ते सक्रिय सहभागी होत असत. सटाणा नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून कामकाज करताना त्यांनी शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद रावजी पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ते सर्वपरिचित होते. सामाजिक, राजकीय तथा व्यवसायिक क्षेत्रातील सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे विजय राज वाघ यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेतील माध्यमिक शिक्षक स्वप्निल वाघ व सामाजिक कार्यकर्ते सुमित वाघ यांचे ते वडील होत

Comments are closed.