मुंबई/एनजीएन नेटवर्क
शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेकडो संर्थकांसह शिवबंधन बांधण्यासाठी वाकचौरे शिर्डीतून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. वाकचौरे यांना शिर्डीमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची च्कॅरचा आहे. दरम्यान, शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून शब्द मिळालेल्या माजी मंत्री बबनराव घोलप आता काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2009 साली रामदास रामदास आठवले यांचा पराभव करत शिवसेनेकडून खासदार झालेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज पुन्हा घरवापसी केली आहे. 2014 साली उमेदवारी जाहीर होऊनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. आपल्या शेकडो संर्थकांसह वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
घोलप काय करणार ?
शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप यांना ‘मातोश्री’ने शब्द दिला होता. त्यादृष्टीने घोलप यांनी दौरे करून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारीही सुरु केली होती. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा शिव्बंधान बांधल्याने आता घोलप काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.