NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

वज्रमूठ.. अंजनेरी-ब्रम्हगिरी रोपवे प्रकल्प पुढे रेटल्यास विरोधात प्रचार

0

त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क

तालुक्यातील प्रस्तावित अंजनेरी-ब्रम्हगिरी रोपवे प्रकल्पाने जैवविविधता आणि अंजनेरी पर्वतावरील गिधाडांचा अधिवास धोक्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या रोपवेला पर्यावरणप्रेमी व स्थानिक ग्रामस्थांनी जटायू पूजन करीत विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाने अंजनेरी आणि ब्रम्हगिरीतील पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन भारतीय वन्यजीव मंडळाने करावे. तथापि, परस्पर हा प्रकल्प पुढे रेटल्यास विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत निसर्गप्रेमी व सहकारी एकत्रितपणे विरोधात प्रचार करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पासाठी खा. हेमंत गोडसे हे आग्रही आहेत. या प्रकल्पाची व्यवहार्यता आणि आराखड्याचे काम झाल्यानंतर केंद्र शासनाने प्रस्तावित प्रकल्पाच्या निविदा मागविल्या असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यावरणप्रेमी संघटनांची हुतात्मा स्मारक येथे बैठक होऊन विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. यावेळी शेखर गायकवाड अरविंद निकुंभ, संदीप भानोसे, रमेश अय्यर, भारती जाधव, जयेश पाटील, प्रतीक्षा कोठुळे, विशाल देशमुख, अंबरीश मोरे, वैभव देशमुख यांसह ग्रीन रिव्होल्युशन, वृक्षवल्ली आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत निश्चित झाल्यानुसार रविवारी सकाळी निसर्गप्रेमींनी ब्रम्हगिरी येथे जटायू पूजन करीत रोपवे प्रकल्पाविरोधात अभियानास सुरुवात केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.