पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) च्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत असून एकूण बाधित रुग्णांची संख्या 100 पेक्षा जास्त झाली आहे. आरोग्य सेवा सुविधा या वाढत्या प्रकरणांना प्रतिसाद देत असताना या आजाराच्या प्रभावी व्यवस्थापन आणि उपचारासाठी आरोग्य विम्याच्या महत्त्वावर भर दिला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ‘गुलियन बॅरी सिंड्रोममध्ये शरीराची प्रतिकारशक्ती पेरीफेरल नर्वस सिस्टीम (परिघीय मज्जासंस्थेच्या) एका भागावर हल्ला करते. हा सिंड्रोम स्नायूंची हालचाल नियंत्रित करणाऱ्या तसेच वेदना, तापमान आणि स्पर्श संवेदना प्रसारित करणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम करू शकतो. त्यामुळे स्नायू कमजोर होणे, हात-पायांमध्ये संवेदना कमी होणे आणि गिळण्यास किंवा श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. हा एक दुर्मिळ आजार आहे आणि प्रामुख्याने प्रौढ व पुरुषांमध्ये आढळत असला तरी सर्व वयोगटांतील लोकांना याचा धोका असतो.”
जागतिक आरोग्य संघटनेने पुढे असेही सांगितले आहे की गुलियन बॅरी सिंड्रोम जीवघेणा आजार ठरू शकतो. जीबीएस असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. गुलियन बॅरी सिंड्रोमच्या उपचारांसाठी रुग्णालयात भरती होणे व अतिदक्षता विभागात उपचार घेणे आवश्यक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय खर्च होतो. अशा गरजेच्या वेळी व्यापक आरोग्य विमा पॉलिसी असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण त्यामुळे आर्थिक ओझ्याशिवाय दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळू शकतात.
एक विश्वासार्ह विमा ब्रँड असलेला टाटा एआयजी व्यापक आरोग्य विमा योजना सादर करत असून अशा गंभीर आजारांच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाला संरक्षण देते. त्यामुळे कुटुंब आत्मविश्वास आणि मन:स्वास्थ्य राखून या आरोग्यविषयक संकटाचा मुकाबला करू शकतात. टाटा एआयजी मेडिकेअर प्रीमियर ही एक व्यापक आरोग्य विमा योजना असून, यामध्ये खालील प्रकारचे कव्हरेज अंतर्भूत आहे:
�� इन-पेशंट उपचार: विमाधारक व्यक्तीला पॉलिसी कालावधीत आजार/विकार/जखम होऊन रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासल्यास त्यावरील खर्चाचा समावेश.
��ओपीडी कव्हर: पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार दरवर्षी बाह्यरुग्ण सल्लासेवा आणि औषधोपचारांचा समावेश. हा लाभ वेळेवर वैद्यकीय मदत आणि आवश्यक औषधोपचार सुनिश्चित करत आर्थिक बाबींची चिंता न करता प्रभावीपणे आरोग्य व्यवस्थापन करायला मदत करतो.
�� कंझ्युमेबल्स कव्हर: रुग्णालयात दाखल झाल्यास, उपचाराच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विशिष्ट वैद्यकीय वापराच्या वस्तूंच्या खर्चाचा समावेश. त्यामुळे रुग्णालयात भरती झाल्यावर स्वतःच्या खिशातून होणारा अतिरिक्त खर्च वाचतो.
�� रुग्णालयात भरती होण्याच्या आधी आणि नंतरचा खर्च: रुग्णालयात दाखल होण्याच्या पूर्वी आणि डिस्चार्जनंतर विशिष्ट कालावधीत झालेल्या तपासण्या, सल्लासेवा आणि औषधोपचारांवरील खर्चाचा समावेश.
�� विमाधारक मुलासोबत राहण्यासाठी दैनंदिन रोख रक्कम: जर 12 वर्षे किंवा त्याखालील वयाचे मूल रुग्णालयात दाखल असेल, तर प्रत्येक 24 तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठी दैनंदिन निश्चित अशी रोख रक्कम दिली जाते.
�� रुग्णवाहिका कव्हर: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाण्यासाठी किंवा चांगल्या उपचारांसाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात विमाधारक रुग्णाला हलवण्यासाठी नोंदणीकृत रुग्णवाहिकेच्या खर्चाचा समावेश. हे संरक्षण निश्चित मर्यादेपर्यंत लागू आहे.
�� अतिरिक्त सेवा: विमाधारक व्यक्तीच्या आरोग्य सुधारण्यासाठी जनरल आणि विशेषज्ञ डॉक्टरांकडून अमर्यादित टेलिकन्सल्टेशन आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला.
�� भारतात कॅशलेस हॉस्पिटलायझेशन: महाराष्ट्रभरातील 2500 हून अधिक नेटवर्क रुग्णालयांमध्ये संपूर्ण कॅशलेस सेटलमेंटची सुविधा. त्यामुळे रुग्णालयात भरतीपासून डिस्चार्जपर्यंत कोणताही आर्थिक ताण जाणवत नाही.
टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीचे चीफ अंडररायटिंग आणि डेटा सायन्स ऑफिसर नील छेडा म्हणाले, “आम्ही लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना अनपेक्षित वैद्यकीय संकटांचा सामना करण्यास सक्षम करणारे विश्वासार्ह आरोग्य विमा उपाय सादर करण्यासाठी वचनबद्ध आहोत. महाराष्ट्रात जीबीएस सारख्या आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे, टाटा एआयजी वेळेवर वैद्यकीय मदत आणि आर्थिक स्थैर्यासाठी सहज उपलब्ध, व्यापक कव्हरेज पुरवत राहील.”