दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) नाशिक शाखेतर्फे सन्मान
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
देशातील 15 अभियांत्रिकी शाखांचे प्रतिनिधित्व करणारी अग्रगण्य संस्था दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) नाशिक शाखेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा इंजिनिअर अचिव्हमेंट पुरस्कार सन 2025 साठी संजीवनी इंफ्रा कंपनीचे संस्थापक इंजि. अतुल एस. अडावदकर यांना प्रदान करण्यात आला.
हॉटेल ताज गेटवे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सोहळ्यात वंदे भारत एक्सप्रेसचे जनक डॉ. सुधांशू मणी यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंजि. अडावदकर यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी अनेक सरकारी प्रकल्प दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण केले आहेत.
Comments are closed.