NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

300 कोटींचे पोलीस आयुक्तालय हडपण्याचा प्रयत्न.. नाशिकमधील धक्कादायक प्रकार

0

नाशिक : शहरामध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. सुमारे २१ भूमाफियांनी थेट नाशिक पोलीस आयुक्तालय बळकावण्याचा प्रयत्न समोर आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भूमाफियांच्या टोळीत नाशिकमधील लौकिकप्राप्त बांधकाम व्यवसायिकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकमध्ये भूमाफीयांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

प्राप्त माहितीनुसार, नाशिक शहरातील शरणपूर गावठाण परिसरात असलेले जुने नाशिक पोलिस आयुक्त कार्यालय आहे. नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन च्या मालकीची असलेली शरणपूर गावठाणातली शहरातील मध्यवर्ती भागातील जागा आहे. सध्याचे उपायुक्त कार्यालय असलेल्या या जागेमध्ये नुकतेच मुख्यमंत्र्यांनी यावर कॉमन मॅन च्या पुतळ्याच उद्घाटन केले होते.  या जागेची किंमत जवळपास तीनशे कोटी रुपये आहे. मात्र ही जागा अवघ्या काही कोटींमध्ये आपल्या मालकीच्या नावे करण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यवसायिकांनी केल्याचे उघड झाले आहे. याबाबतचा अहवाल भूमी अभिलेख विभागांना दिल्यामुळे आता नाशिक पोलिसांनीच शहरातील २१ नामवंत बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

काय आहे प्रकरण ?

ख्रिश्चन समुदायाच्या या ट्रस्ट कडून पोलिसांनी ही जागा गेल्या वीस वर्षापासून भाड्याने घेतली आहे. जवळपास तीन हजार एकर असलेल्या विविध मालमत्ता एन डी टी ए नावाने असल्याने वादग्रस्त म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी या मालमत्तांच्या व्यवहारांवर बंदी आणली होती. सातबारावर तसे शिक्केही मारण्यात आले होते.  मात्र नवीन एन डी सी कंपनी स्थापन करून धर्मदाय आयुक्त च्या संगणमताने काही जमिनींचे व्यवहार करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता बांधकाम व्यावसायिकांचे उद्योग समोर आणण्यासाठी महसूल प्रशासनातून अहवाल मागवले . या अहवालानुसार ही संपत्ती बळकवण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झालं .मात्र १९४५ आणि १९५४ च्या खरेदी विक्री रेकॉर्डनुसार ही जागा केवळ एनडीटीएची असल्याच समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.