श्रीरामपूर/एनजीएन नेटवर्क
संगमनेरमध्ये पब्जी गेमच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी एकास अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे अक्रम शाहाबुद्दिन शेख असे नाव आहे. संगमनेर येथील एका 22 वर्षीय पीडित तरुणीशी पब्जी बिजीएमआय गेमच्या माध्यमातून आरोपी अक्रम शाहाबुद्दिन शेखने ओळख केली होती. हा आरोपी मूळचा अलीनगर जिल्हा दरभंगा बिहार येथील आहे. अक्रमसोबत त्याचा एक मित्र नेमितुल्ला हादेखील थेट बिहारहून संगमनेरात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरु केला आहे.