मुंबई/एनजीएन नेटवर्क
न्युयॅार्कमधल्या सुप्रसिध्द टाईम स्क्वेअरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला आहे. न्युयॅार्क शहरातील टाईम स्क्वेअरवर झळकणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील पहिले राजकारणी आहेत. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी एक जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचे फोटो न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल या तिघांचे फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत. राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. राहुल कनाल यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी कनाल यांचे शिवसेनेत स्वागत केले होते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले होते. याच पक्षप्रवेशाचे फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत.