NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शिंदेंची तळमळ कौतुकास्पद..मोदींचे प्रमाणपत्र

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिट्वीट करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्वीट करत लिहिले की, देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.