नाशिक : म्हसरूळ,पंचवटी, दिंडोरी रोड परिसरातील एकता ज्येष्ठ नागरिक मंडळ, विरंगुळा केंद्राची सांस्कृतिक सहल गोवर्धन इको व्हिलेज ( पालघर ) या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यात 41 ज्येष्ठ सभासदांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. सकाळी सहा वाजता निघालेली सहल ही रामनामाच्या घोषात तसेच वेगवेगळे अभंग, गाणे म्हणत जव्हार येथे पोहोचली. त्या ठिकाणी जव्हार चा राजवाडा सर्वांनी पाहिला. राजांचे 200 वर्षांपूर्वीचे वैभव आजही चांगल्या सुस्थितीत दिसत आहे.
या ठिकाणी गाडीतील आलेल्या आचारी वर्गाने सुग्रास उपमा सर्वांना खाऊ घातला .त्यानंतर सर्व जेष्ठ मंडळी ही गोवर्धन इको व्हिलेज पालघर या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत पोहोचली. सुरुवातीलाच दुपारची वेळ झालेली असल्यामुळे सुग्रास प्रसादाचा लाभ या ठिकाणी सर्वांनी घेतला व 100 एकर विस्तीर्ण परिसरामध्ये इस्कॉन च्या माध्यमातून बांधलेल्या श्रीकृष्ण राधेच्या विविध लीला, मंदिरे याचे दर्शन घेतले. उंच सखल टेकडीवर व घनदाट जंगलामध्ये खूपच मनोवेधकपणे, कृष्ण लीला चे चित्र, मूर्तीरूपाने प्रदर्शित करण्यात आलेले आहे. या ठिकाणचा सेवक रुंद अतिशय नम्रपणे सर्वांना माहिती पुरवत होता. परतीच्या प्रवासात निघताना एका माळरानावर चहाचा आस्वाद आमच्या आचारी कंपनीने करून दिला व सायंकाळी पोहोचल्यावर जेवणाचा आस्वाद घेऊन सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी घराकडे निघाली. अत्यंत नियोजन पूर्वक व कुठल्याही ज्येष्ठांना कसलाही त्रास न होता ही सहल अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या सहलीच्या आयोजनात एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप वाढणे ,सचिव श्री भोईसर तसेच श्री .सतीश जोशी ,श्री. विभाडिक श्री पगार सर इत्यादींनी बहुमोल परिश्रम घेतले