नाशिक/एनजीएन नेटवर्क
नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक संस्थेतर्फे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उंबरठाण, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना, शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये रेनकोट, छत्री, वह्या अशा विविध प्रकारचे साहित्य याचा समावेश होता. या शाळेतील २४० विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव, सुनिता वाणी, संदीप देव, रिदम, साहिल ,भूषण तलवारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उंबरठाण बीटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ नेहा शिरोरे, पंचायत समिती सदस्य विजय घांगळे, सरपंच गिरीश गायकवाड, उपसरपंच शिवराम गावित, सदस्य माधव पवार, ग्रामपंचायत सदस्य, पेसा कमिटी अध्यक्ष सुरेश चौधरी, आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण बागुल, मधुकर खोटरे, आदी मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंजुळा गावित, जयराम धूम, मनोहर चौधरी, राजेंद्र गावित, सुमित्रा जाधव, संगीता भोये, राहुल सावळे, योगिता महाले, सिताराम वळवी, पंडित गावंडे, भागा चौधरी आधी शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले. विजय इंगळे आणि गिरीश गायकवाड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राजेंद्र गावित यांनी केले