भगूर/दीपक कणसे
प्रबोधन युवक संघटना व शिवसेना भगूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना ठाकरे गट पक्ष संघटनेचा ५७ वा वर्धापन दिन भगूरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर,माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर,शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे, माजी शहर प्रमुख अंबादास कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यामंदिर शिक्षण समिती संचलित प्राथमिक विद्यामंदिर भगूर येथील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्राथमिक विद्या मंदिराचे शिक्षक महेंद्र महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रबोधन युवक संघटनेचे अध्यक्ष श्याम ढगे यांनी प्रस्ताविकात बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या धोरणानुसार संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून गरजू होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. मुंबई नंतर भगुर मध्ये शिवसेना शाखेची स्थापना झाली स्वतः बाळासाहेब ठाकरेंना भगुर विषयी आपुलकी होती आज शिवसेना पक्ष संघटनेचा वर्धापन दिन दिनाचे औचित्य साधून प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. शिवसेनाप्रमुख उस्मान बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले समाजकार्य यापुढेही बहुर शहरात सुरूच राहील असेही प्रबोधन युवक संघटनेचे अध्यक्ष शाम ढगे यांनी सांगितले.
याप्रसंगी भगूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती झुटे, अनिता ढगे, कविता यादव, भगूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शंकर करंजकर, व्हाईस चेअरमन पांडुरंग आंबेकर, संचालक मनोहर गायकवाड राजेंद्र जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख नितीन करंजकर, शिवसैनिक तुषार राठोड बाळासाहेब कुटे, शरद झुटे, शरद कातकाडे आदींसह प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका वंदना आडके, शिक्षिका विजया चतुर लीलके, शिक्षक महेंद्र महाजन आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका विजया चतुर यांनी केले.
# छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवराय व बाळासाहेब ठाकरे बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेस शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे यांनी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भगूर नगरी सोसायटीचे संचालक मंगेश बुरके, नितीन करंजकर श्याम ढगे नंदू धात्रक शशिकांत देशमुख दिनेश आर्य बाळासाहेब साळवे युवराज शिरसाठ देविदास गीते राजेंद्र सूर्यवंशी बोराडे आदिल्स शिवसैनिक युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विक्रम सोनवणे यांनी शिवसेना पक्षाविषयी सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत स्वातंत्र्यवीर सावरकरांची नगरी भगूर शहरावर बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते तर शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचे अनवरण बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तेच त्यावेळी करण्यात आले होते या आठवणीलाही सोनवणे यांनी उजाळा दिला.