NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर निलंबित

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

नाशिक महापालिकेच्या वादग्रस्त शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेश राज्याचे उपसचिव टी. वा. करपते यांनी काढले आहेत. 

सुनिता धनगर यांना लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्षण विभागातील सर्वात मोठी कारवाई करत एसीबीने धनगर यांच्या घरातून कोटींचे घबाड बाहेर काढल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याच्यातच नागरिकांकडून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली. दरम्यान सुनीता धनगर यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शासन निर्णयानुसार पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत 48 तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास सरकारी सेवेतील व्यक्तींना शिक्षण निलंबित केले जाते. त्यानुसार सुनीता धनगर यांना निलंबित करण्यात आले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.