NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘आरएल’ वर ४० तास छापेमारी; ८७ लाखांची रोकड, ५० किलो सोने..

0

जळगाव/एनजीएन नेटवर्क

येथील आरएल ग्रुपवरील ईडीची कारवाई ४० तासांनंतर संपली आहे.जळगावच्या इतिहासातील ईडीची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. ईडीने गुरुवारी आरएल ज्वेलर्सवर छापेमारी केली होती. या कारवाईने राज्यभर एकच खळबळ उडाली. काल रात्री ईडीचे अधिकारी ज्वेलर्स शॉपमधून निघून गेले. ईडी अधिकाऱ्यांनी आर. एल. समूहाकडून दागिने, रोकड, तसेच महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे.

ईडीने गुरुवारी सकाळी एकाच वेळी नाशिक, ठाणे, जळगाव आदी काही ठिकाणी आर.एल. ग्रुपवर छापेमारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ‘आरएल’ ज्वेलर्सवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. ईडीच्या पथकाकडून तब्बल ८७ लाख रुपयांची रोकड आणि ५० किलो सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे याशिवाय महत्वपूर्ण कागदपत्रेही जप्त करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तात पथकाने सर्व सील केलेला मुद्देमाल एका लोखंडी पेटीत ठेवण्यात आला. त्यानंतर हा मुद्देमाल घेऊन पथक रवाना झाले.

@ ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. त्यांचे आभार मानतो. त्यांनी त्यांची कारवाई पूर्ण केली आहे. या कारवाईत कुठला राजकीय दबाव होता की नाही हे आता न बोललेले बरे. त्यांन हव्या असलेल्या सर्व गोष्टींची आम्ही पूर्तता केली. ईडी पथकाने ने मोठ्या प्रमाणावर पैसे, दागिने तसेच कागदपत्र जप्त केली आहेत,

  • मनिष जैन, संचालक, आरएल ज्वेल्लर्स, जळगाव
Leave A Reply

Your email address will not be published.