मुंबई/एनजीएन नेटवर्क
बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरू आहे. तब्बल १५ हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणातही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल चहल यांचीही यापूर्वी या प्रकरणा संदर्भात ईडीनं चौकशी केली होती. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी सुरू आहे. कोविड काळातील कंत्राटांप्रकरणी इडी चौकशी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कोविड काळात दिले गेलेल्या कंत्रांटांसंदर्भात छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
सूरज चव्हाण यांच्या घरीही पथक
शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे. विविध निवडणुकांमागे पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्या हाती असतात. मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि परिषदेच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे.