जळगाव/एनजीएन नेटवर्क
राज्यभर लौकिक असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची वक्रदृष्टी वळली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्भात ईडी पथकाने नाशिकसह सहा ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती पुढे आली आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि माजी आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या असलेल्या ख्यातकीर्त पेढीवरील या छापेमारीमुळे सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे. यामुळं जळगावच्या सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्बात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या जळगाव, नाशिक, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणच्या फर्म्सवर स्वतंत्र ईडी पथकांनी छापेमारी केली. सर्व ठिकाणी मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईमध्ये ईडीचे एकूण 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे. मागील वर्षीसुद्धा सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली होती. चौकशीअंती नेमकी काय कारवाई करण्यात येते, ही बाब महत्वाची मानण्यात येत आहे.