मुंबई/एनजीएन नेटवर्क
नाशिक शहरातील बहुचर्चित महापालिका शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्या अडचणी वाढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्या लाच प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’ च्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.
महापालिका शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांन गेल्या काही दिवसांपूर्वी ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतरच्या तपासणीत त्यांच्या बेनामी मालमत्तेची मोठी चर्चा झाली होती. यासंदर्भात आज सीमा हिरे आणि काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लाच प्रकरणाच्या ‘ईडी’ चौकशीची घोषणा केली. या घोषणेमुळे धनगर यांच्या अडचणी वाढणार हे मात्र निश्चित.