NGN News
Latest Marathi News

वसई-विरारचे ‘ते’ माजी आयुक्त ईडीच्या ताब्यात; कारवाईने खळबळ

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

वसई-विरार परिसरातील बांधकाम प्रकल्पांत निर्णायक भूमिका वठवल्याचा आरोप असलेल्या माजी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीने बुधवारी रात्री मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असल्याने पवार हे अधिक चर्चेत आले असताना आता या कारवाईने खळबळ उडाली आहे. पवार यांच्यासोबत नगररचना उपसंचालक (निलंबित) वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक तथा बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता या त्रिकुटालाही ताब्यात घेण्यात आले.

गेल्या २९ जुलै रोजी ईडीने मुंबई, नाशिक, पुणे आदि १२ ठिकाणी छापेमारी करून १.३३ कोटींची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे, बँक डिपॉझिट स्लिप्स आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती. पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांची यानंतर कसून चौकशी करण्यात आली. शिवाय त्यांच्या नाशिक आणि सटाणा येथील त्यांच्या मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. ईडीच्या तपासात २००९ पासून वसई-विरार महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक इमारतींच्या बांधकामात पवार आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले. बांधकाम परवानगीसाठी प्रति चौरस फूट २० ते २५ रुपये आणि नगररचना उपसंचालकांकडून १० रुपये प्रति चौरस फूट कमिशन घेतल्याचा आरोप आहे. शहरातील ४१ बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे तसेच या घोटाळ्यामुळे सुमारे अडीच हजार कुटुंब बेघर झाल्याचे निष्पन्न झाले

Comments are closed.