मुंबई/एनजीएन नेटवर्क
आपले पती नितीन देसाई यांनी मानसिक त्रासामुळे स्वतःला संपवले. ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस कंपनीचे अधिकारी कर्जाबाबत पतीला वारंवार त्रास देत होते, असा गंभीर आरोप देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी केला आहे. या आरोपांनंतर पाच जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या जबाबात नेहा देसाई म्हणाल्या, माझे पती यांच्यावरती असलेल्या मानसिक दडपणामुळे ते घरामध्ये कोणाशी काही न बोलणे गप्प गप्प राहत होते किंवा कधीही चिडचिडेपणा करीत होते. २०२३ च्या मार्च महिन्यामध्ये घरामध्ये फक्त आम्ही दोघेच असताना माझे पती माझ्यासमोर रडले आणि हे लोक माझ्या स्वप्नातील स्टुडिओ गिळंकृत करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे मला जीवन जगणे असह्य झाले आहे, असे त्यांनी बोलून दाखवले होते.
नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलव्हाईज कंपनीकडून तब्बल १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. १८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक विवंचनेत अडकल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलले असे सांगण्यात येत आहे. आता नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.