** पुरुषोत्तम कांडेकर
देवळाली कॅम्प : एनजीएन न्यूज नेटवर्क
‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘खंडेराव महाराज की जय’ असा जयघोष करत व बेल-भंडाऱ्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवळालीच्या खंडोबा टेकडी येथे चंपाषष्ठी उत्साहात साजरी झाली. खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी १२ गाड्या ओढल्या. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.
देवळालीतील श्री खंडेराव यात्रेत पहाटे पूजाविधी अथर्व आमले यांच्या हस्ते पार पडला. मार्तंड मल्हारीसह म्हाळसा-बाणाईच्या मूर्तीना नवीन पोशाख परिधान करण्यात येऊन अलंकाराने सजविण्यात आले. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन. आर. पाण्डे, उत्तमराव मांडे,सचिन ठाकरे,नागेश देवाडिगा यांच्या, नीता गोडसे, भरत वाघमारे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सकाळी १० वाजता भगूर येथून आमले परिवाराच्या वतीने संबळाच्या तालावर निघणारी मानाची काठी व पालखी मिरवणूक टेकडीवर आणण्यात आली. येथे पूजन व महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. येथील अन्नाज ग्रुपच्या वतीने महाआरती करण्यात येऊन भरीत भाकरी प्रसाद ५०० भाविकांना वाटप करण्यात आला. त्यात भरीत, भाकरी व ठेचा असा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी नागेश देवाडिगा, सुरेश शेटे, संजय पवार, संतोष घोडे, विजय तिवारी, रामनिवास सारडा, संजू आढाव , राजू पगारे, शरद गोडसे, धरम पापनेजा, अनिल पाळदे, निलेश गायकवाड, नवीन नागपाल आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
वैशिष्ट्ये :
*सुमारे तीन हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ .
*पहाटे पाचपासून पुजाविधी.
* महिलांनी खंडोबाला हळद लावत केले औक्षण
* येळकोट येळकोट जय मल्हार करत मंदिराच्या प्रांगणात तळी
Comments are closed.