NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

मॉर्निंग वॉक करणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदाराच्या अंगावर डम्पर..

0

धाराशिव/एनजीएन नेटवर्क

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच ते मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा एक भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला. प्रसंगावधान राखत ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ओमराजेंनी पाठीमागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत डम्परचा पाठलाग केला आणि रेल्वे गेट परिसरात डम्पर चालकाला पकडले.  रामेश्वर कांबळे असं या डम्पर चालकाचे नाव आहे. बाईकवाल्याला ओव्हरटेक करताना हा प्रकार घडल्याचा जबाब चालकाने दिला आहे. या सर्व घटनेमागे घातपात तर नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ओमराजे यांनी ढोकी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याची पोलीस चौकशी करत आहेत. हा प्रकार चालकाच्या चुकीमुळे झाला? की यामागे काही घातपाताचा हेतू होता का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वीही झाला होता. 2019 मध्ये ओमराजे निंबाळकर खासदार झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ पाडोळी येथे चाकू हल्ला झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.