मुंबई/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ नेत्रचिकित्सातज्ज्ञ पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात डाॅ. तात्याराव लहाने यांच्यावर अनधिकृत (शासन आदेश नसताना) शस्त्रक्रिया केल्याचा ठपका ठेवला आहे.
‘698 शस्त्रक्रिया अनधिकृत’
बीबीसी मराठीला जेजे रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमलेल्या या समितीच्या चौकशी अहवालानुसार, डाॅ. तात्याराव लहाने यांनी सरकारच्या मान्यतेशिवाय किंवा कुठलीही ऑर्डर नसताना 698 शस्त्रक्रिया केल्या आहेत. जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी डाॅ. तात्याराव लहाने, नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुख डाॅ. रागिणी पारेख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती नेमली होती.
@डाॅ. तात्याराव लहाने वैद्यकीय शिक्षण विभागाचे (DMER) संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर आणि राज्य सरकारचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाचे समन्वयक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी या मधल्या काळात कोणतीही ऑर्डर नसताना डाॅ. लहाने यांनी या 698 शस्त्रक्रिया केल्याचे समिती अहवालात आढळून आलं आहे.
- वरिष्ठ अधिकारी, जे जे रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकारी