NGN News
Latest Marathi News

डॉ. प्रकाश जोशी यांचेतर्फे यशवंत व्यायाम शाळेला दहा लाख देणगी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

वैद्यकीय क्षेत्रात प्रख्यात असंलेले सुप्रसिद्ध विशेषज्ञ डॉ. प्रकाश जोशी आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी डॉ. ललिता प्रकाश जोशी यांच्या वतीने श्री यशवंत व्यायाम शाळेला दहा लाख रुपये देणगी देण्यात आली. आज सकाळी त्यांनी प्रत्यक्ष यशवंत व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील यांच्याकडे दहा लाख रुपयाचा चेक सुपूर्त केला. यावेळी व्यायाम शाळेचे संचालक डॉ. जयराम महाबळ, व्यायाम शाळेचे खजिनदार विजय खरोटे उपस्थित होते.

दिपक पाटील यांनी या मोठ्या देणगीबद्दल डॉ. प्रकाश जोशी यांचे यशवंत व्यायाम शाळेच्या सर्व सभासदांच्या वतीने आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश जोशी यांना दिपक पाटील, डॉ. जयराम महाबळ आणि विजय खरोटे यांनी यशवंत व्यायाम शाळेच्या दैनंदिन कामकाजाची माहिती दिली. श्री यशवंत व्यायाम शाळा ही संस्था या मार्च २०२६ मध्ये ११० वर्षांमध्ये पदार्पण करणार आहे. सन १९१७ या वर्षी स्थापन झालेल्या या संस्थेचा आणि तमाम नाशिककरांचा गेल्या १०९ वर्षांपासून स्नेहभाव आहे. याच स्नेहभावनेतून व्यायाम शाळेशी जोडलेले अनेक सभासद, हितचिंतक, देणगीदार कायमच व्यायाम शाळेला अश्या प्रकारे योगदान देत आहेत. याच स्नेहभावनेतून डॉ. प्रकाश जोशी आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी डॉ. ललिता प्रकाश जोशी यांनी व्यायाम शाळेला ही भरघोष देणगी दिली आहे. ” राष्ट्रास राक्षीण्याला व्यायाम मंत्र घाव्या ” हे ब्रीदवाक्य असलेल्या आमच्या संस्थेच्या वतीने या देणगीचा उपयोग नाशिकचे व्यायामप्रेमी, लहान मुले-मुली, तरुण, वयस्क व्यक्ती यांचे आरोग्य व्ययस्थित राहण्यासाठी केला जाईल असे आश्वासन यावेळी दीपक पाटील यांनी दिले.

Comments are closed.