नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिकच्या डॉ. नमिता कोहोक ह्यांनी पुन्हा भारताचा नाव अमेरिकेत उंचावले आहे. त्यांना ग्लोबल युनाइटेड पेजन्टतर्फे नमिता कोहोक अँपिअरन्स अवॉर्ड २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याआधी त्यांना २०१७ मध्ये मिसेस ग्लोबल युनाइटेड २०१७ , २०१८ मध्ये मिसेस ग्लोबल युनाइटेड लाइफटाईम क्वीन २०१८ आणि आता ग्लोबल युनाइटेड लाइफटाईम एलिट क्वीन २०२३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
दर वर्षी जुलै महिन्या मध्ये ग्लोबल युनाइटेड पैजंट असते. सुमारे ४० हून अधिक देशांमधून कॅन्सर सर्वायवर स्पर्धक इथे येतात. एक आठवडा वेग वेगळे राऊंड्स होतात. ही स्पर्धा कॅन्सर सरवयवर्ससाठी भरवली जाते. नमिता कोहोक ह्या पहिल्या भारतीय आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्पर्धेत २० देशांतील २८ शॉर्ट लिस्टेड क्वीन्स होत्या. यामध्ये भारताच्या नमिता कोहोक ह्यांना सर्वात जास्त मते मिळाली आणि त्यांना विजेता घोषित करण्यात आले.
त्यांचं कॅन्सर पेशंट्स साठी च काम , सकारात्मक विचारांवरचे व्याख्यानाने , गरजू पेशंट्स ( त्यात छोटी मुलांचे केमोथेरपी ) साठी फंडस् जमा करणे , समाजात कॅन्सर पेशंट्स साठी जी मदत शक्य होईल ती करणे, कॅन्सर पेशंट्स चा कौन्सेलिंग , ह्या सर्व गोष्टी स्पर्धेत निर्णायक ठरल्या. त्या अमेरिकेत ह्या ग्लोबल युनाइटेड प्रोग्रॅममध्ये प्रभावी ठरल्या. विंडी हौगर , ईल्लेणा व अमांडा ह्या ग्लोबल युनाइटेड पेजन्ट च्या नॅशनल डायरेक्टर्स ने नमिता कोहोक ह्यांना हा पुरस्कार बहाल केला.
श्रेय गुरु, परिवाराला..
नमिता कोहोक ह्या 6 वर्षांत 5 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. निष्ठा, चिकाटी, अपार मेहनत, परिवाराची साथ ह्या मूळे त्या आज अमेरिकेतल्या ग्लोबल युनाइटेड ह्यांच्या सर्वात मोठ्या पदाच्या मानकरी ठरल्या व आता त्या त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये आल्या आहेत . आता आयुष्यभर ग्लोबल युनाइटेडशी जोडल्या गेल्या आहेत. त्याचे श्रेय त्या त्यांच्या गुरूंना आणि परिवाराला देतात . त्यांच्या ह्या यशाने त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की , जीवनात ठरवले तर काहीच अशक्य नाही आहे . त्यांच्या ह्या यशाने त्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.