NGN News
Latest Marathi News

डॉ. हेमलता पाटील अखेर राष्टवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षात दाखल

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

कॉंग्रेस पक्ष सोडून शिन्देसेनेत काही दिवस राहिलेल्या महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी अखेर राष्टवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

मंगळवारी मुंबईत पक्ष कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश प्रसंगी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ, आ. हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर आदी उपस्थित होते.

———————

@ कॉंग्रेस पक्षात असताना विधानसभा तिकीट नाकारण्यापासून अनेक चुकीच्या घटना घडत गेल्यामुळे आपण तो पक्ष सोडला. जिथे निष्ठेला किंमत नाही, तिथे राहण्यात स्वारस्य नाही, हा विचार त्यामागे होता. अजित पवार यांचे नेतृत्व समर्थ आणि धडाडीचे असल्याने कोणत्याही अपेक्षेविना मी राष्टवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

  • डॉ. हेमलता पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या, नाशिक महापालिका

Comments are closed.