NGN News
Latest Marathi News

विद्युत भवन येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवार (१५ ऑक्टोबर) रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मानव संसाधनचे सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, कार्यकारी अभियंता योगेश निकम, वरिष्ठ व्यवस्थापक मुरलीधर गवळी यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.