नाशिक/एनजीएन नेटवर्क
लायन्स क्लब नाशिक पंचवटी गेल्या १९ वर्षापासून शहरातील यशोवंत कार्य करणाऱ्या डॉक्टर्सचा सत्कार डॉक्टर्स डे निमित्ताने करीत असते. क्लब तर्फे २० वा डॉक्टर्स डे प्रथेप्रमाणे डॉक्टरांच्या कर्मभूमीत रुग्णालयात पार पडला. ह्यावेळी लायन्सचे माजी प्रांतपाल व प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ वैद्य विक्रांत जाधव प्रमुख पाहुणे होते.
कोविड काळानंतर डॉक्टरांची खरी कसोटी ,त्या विजयाचा आनंद वेगळा शहराचे आरोग्य व्यवस्था सुव्यवस्थित ठेवणे रुग्णाला आनंद देणे आणि त्याच्या परिवाराच्या शुभेच्छा आशीर्वाद मिळवणे हीच खरी फी. आपल्या अभ्यास अनुभवाने अनेक वर्षे त्याच आनंदात ठेवणाऱ्या ह्या डॉक्टरांना लायन्स पंचवटीचा हा सलाम आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे वैद्य विक्रांत जाधव जाधव ह्यांनी व्यक्त केले. डॉक्टरांचे स्वागत नाव निर्वाचित अध्यक्ष लायन सुनील देशपांडे ह्यांनी केले. धन्वंतरी स्तवन सौ स्मिता देशपांडे ह्यांनी करून प्रथम धन्वन्तरींचे आशीर्वाद सर्वांना मिळून दिले
२२-२३ वर्षी अविरत परिश्रम करून आपल्या अभ्यास व अनुभवाने सेवा देणाऱ्या चिकित्सकांची निवड करण्यात आली .कोविड नंतरच्या काळात डॉक्टरांनी आपली सेवा त्याच हेतूने देणाऱ्या ह्या चिकित्सकांचा सन्मान प्रेरणादायी ठरेल. ह्या वेळी नाशिक माधिल चिकित्सक डॉ आशुतोष मुंगी तसेच दंत शल्य चिकित्सक ज्यांनी कोविड सारख्या काळात स्वत आपले आरोग्य समर्पित करून कार्य केले व तसेच सामाजिक भान ठेऊन कार्य करीत आहेत असे डॉक्टर अमित प्रभू व डॉ नुपूर प्रभू ह्यांना सन्मानित केले.
कार्यक्रमात सत्कार घेताना डॉक्टर आशुतोष मुंगी ह्यांनी हा सत्कार ही आगामी काळातील जबाबदारी असून ह्यामुळे मानसिक बळ अधिक प्राप्त होईल व आपल्या समाजासाठी करणे ही खरी “डॉक्टर” च्या पदवीला मानवंदना ठरेल असे व्यक्त केले .डॉ अमित प्रभू ह्यांनी कोविडच्या काळानंतर रुग्ण आणि डॉक्टरांचे संबंध दृढ ठेवणे ही गरज होती आणि दंत चिकित्सा करताना घरातील लहान पासून ते वृद्धापर्यंत संबंध येतो आणि परिवार आपला आनंदी राहिला पाहिजे हेच उद्दिष्ट्य ठेऊन कार्य केले व राहणार नाशिक च्या सुरेख हास्यासाठी नेहमीच प्रभू दाम्पत्य बंद्धील राहील व सेवे देतील असे व्यक्त केले.
लायन्स क्लब पंचवटी चे सन २३-२४ चे अध्यक्ष लायन सुनील देशपांडे ह्यांनी प्रास्ताविक व स्वागत केले , ह्या वेळी लायन्स माजी अध्यक्ष,प्रशांत सोनजे, लायन नंदेश यंदे रितू चौधरी.अरुण अमृतकर सीमा सोनजे , श्याम जगताप, मोहिनी जगताप, अनंत हिरे यांसह लायन्स सभासद होते. सूत्रसंचालन लायन सचिव अमित कोतकर ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन खजिनदार लायन राजेंद्र जाधव ह्यांनी केले.