नागपूर/एनजीएन नेटवर्क
अजनी पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेने बाळाला जन्म दिला. संबंधित डॉक्टरने कुणाला न सांगता या बाळाची विक्री केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली.
डॉ. आशिक बराडे (४२ रा. मानकापूर ) असे डॉक्टरचे नाव असून त्याचे गोधनीत रुग्णालय आहे. प्राप्त माहितीनुसार, अजनीत २८ मार्च २०२३ रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संबंधातून महिलेने डॉ. बराडेंच्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला. परंतु, बलात्काराचा आरोपी व डॉक्टर महिलेला बाळाची माहिती देत नव्हते. त्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात डॉक्टरने खोटे कागदपत्र तयार करून हे बाळ इतरांचे असल्याचे भासवून त्याची विक्री केल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरला अटक केली.