NGN News
Latest Marathi News

प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड काँग्रेस वैद्यकीय सहायता मदत कक्ष प्रदेशाध्यक्षपदी

  • आरोग्य सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा नवा उपक्रम

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या “वैद्यकीय सहायता मदत कक्ष” या महत्त्वाच्या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमाच्या प्रदेशाध्यक्षपदी नाशिकचे प्रा. ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत केली.

आरोग्य क्षेत्रातील जनसंपर्कासाठी महत्त्वाची पुढाकार-

या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय मदत, औषधोपचार, रुग्णवाहिका सेवा, ब्लड बँक समन्वय आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्न्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक शहर व जिल्ह्यात “वैद्यकीय सहायता कक्ष” स्थापन करून स्थानिक गरजांनुसार आरोग्य सेवा राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सचिव बी.एम. संदीप, आ. शिरीष नाईक,आ.हेमंत ओगले, प्रदेश प्रवक्ता सचिन सावंत, माजी आ.शिरीष चौधरी, माजी खासदार बापू चौरे, माजी आ. के.एन. बहीरम, तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील,संदीपभैय्या पाटील,शरदराव आहेर, ब्रिज दत्त,प्रभावती घोगरे,करण ससाणे,जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, शहराध्यक्ष आकाश छाजेड, गटनेते शाहू खैरे, सचिव राहुल दिवे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार,शहराध्यक्ष शाम तायडे,धुळे जिल्हाध्यक्ष प्रविण चौरे,शहराध्यक्ष साबीर शेख,प्रदेश सचिव रमेश कहांडोळे,भारत टाकेकर,सचिन गुजर,अजय फटांगरे,लकी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या विभागाच्या निर्मिती व नियुक्ती बाबत प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी भूमिका प्रस्ताविकातून स्पष्ट केली.शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सूत्रसंचलन केले, तर आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई,केशव पाटील,अल्टमश शेख,संतोष ठाकूर,स्वप्नील पाटील,गौरव सोनार,गौरव पानगव्हाणे,स्वाती जाधव,बबलू खैरे,सुनील आव्हाड,रामदास धांडे,प्रा.अनिल पाटील,उद्धव पवार,वसंत ठाकूर,गणेश कोठुळे,के.के गांगुर्डे,शरद खैरनार,मधुकर शेलार,विनायक शिंदे,विनायक सांगळे,समीर देशमुख,हरेश्वर सुर्वे,प्रशांत बाविस्कर,गणपत चौधरी,शिवाजी कासव,नजीम शेख,गुणवंत होळकर,डॉ.विकास चांदर,दिनकर निकम,विजय पाटील ,नरेंद्र गीते,हनिफ बशीर आदि मान्यवर उपस्थित होते.

मनोगत-
————————————————-
🔹 बाळासाहेब थोरात (ज्येष्ठ काँग्रेस नेते)
-“काँग्रेस पक्षाने नेहमी समाजाच्या प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी काम केले आहे. आरोग्य क्षेत्रात या मदत कक्षाच्या स्थापनेमुळे पक्षाची लोकांशी जवळीक अधिक वाढेल. प्रा. गायकवाड यांच्यासारख्या शैक्षणिक आणि सामाजिक जाण असलेल्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे.
——————————————————
🔹 हर्षवर्धन सपकाळ (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी) -“वैद्यकीय सहायता मदत कक्ष हा केवळ एक विभाग नाही, तर लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे साधन आहे. आरोग्य हा जनतेच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे, आणि काँग्रेस पक्षाने तो लोकाभिमुख सेवा क्षेत्र म्हणून स्वीकारला आहे. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष राज्यभर परिणामकारक ठरेल.”
——————————————————
प्रा. ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड (नवीन प्रदेशाध्यक्ष, वैद्यकीय सहायता मदत कक्ष)-
“ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासह मोठे कर्तव्य आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसेवेच्या विचारातून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय मदत, रक्तदान,आरोग्य शिबिरे राबवून गरजू रुग्णांपर्यंत थेट मदत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. ‘आरोग्यदायी महाराष्ट्र, जनतेसाठी काँग्रेस’ हा आमचा संकल्प आहे.”

आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनसेवा – काँग्रेसची नवी दिशा- या उपक्रमामुळे राज्यभर आरोग्य सेवा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचा सामाजिक आणि मानवतावादी सहभाग अधिक दृढ होईल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

Comments are closed.