पालघर/एनजीएन नेटवर्क
पालघर पुन्हा हादरले आहे. अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र संतापाची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीत गतिमंद असलेली पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. सात महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेत तिला फुस लावून दोन आरोपींनी आकोली ते निसकटे पाड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या झुडपात नेले. पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैगिक अत्याचार केले. गेल्या सात महिन्यांपासून दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैगिक अत्याचार करत होते. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबियांनी तिला तपासणीसाठी दवाखान्यात नेले. तिची तपासणी केली असता पीडित अल्पवयीन गतिमंद मुलगी गरोदर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कुटुंबियांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींची ओळख सांगत नावे देखील घेतली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कुटुंबियांच्या समोर उघड झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात दोन आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांपैकी एका आरोपीला मनोर पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा आरोपीचा शोध मनोर पोलिसांनी मार्फत सुरू आहे.