नाशिक/एनजीएन नेटवर्क
मोदी@9 या कार्यक्रमांतर्गत मंडळश: टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी ,मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, सरचिटणीस वसंत उशीर, प्रतिक शुक्ल यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर टिफिन बैठक प्रसाद मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. भारतीय जनता पक्ष रुजवण्यात ज्या नेत्यांनी अनेकदा खस्ता खाल्ल्या अशा सर्व मान्यवरांचे स्मरण यावेळी करण्यात आले. या बैठकीत घर चलो अभियान.. घर जोडो अभियान ..मोठ्या प्रमाणावर करण्याचे आयोजन करण्यात आले. तसेच 2024 मध्ये जास्तीत जास्त भाजपाचे खासदार निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
यावेळी स्वाती भामरे, अनिल भालेराव, वर्षा भालेराव, नंदकुमार देसाई, प्रदीप पाटील, सुषमा गोराणे, रोहिणी रकटे, सोनाल दगडे, पूर्वा सावजी, सोनाली जोशी, निखिल पवार, दिनेश जाधव, संगीता जाधव, मोहन गायधनी, प्रसाद धोपावकर, महेश सदावर्ते, पंकज भुजंग, अमोल गांगुर्डे, चित्रेश वस्पटे, तुषार देवरे, विनोद येवलेकर, आदित्य केळकर, बबलू परदेशी, संजय परदेशी, ऋषिकेश ढापसे, ऋषिकेश ठाणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.