नाशिक/एनजीएन नेटवर्क
युनियन बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असून बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रात विशेष कार्य केलेले आहे. डिजिटल बँकिंग मधील पुढचे पाऊल म्हणून युनियन बँक ऑफ इंडियाने पवन नगर येथील जिजामाता मंडी येथे डिजिटल बँकिंग व्यवहार सुरू केले. यापुढे कुठलाही विक्रेता डिजिटल व्यवहाराद्वारे देवाण-घेवाण करू शकणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर तथा सुनील पाटील, भाऊसाहेब नारायणे हे उपस्थित होते युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक श्री सौरभ अग्रवाल उपक्षेत्रीय प्रबंधक श्री अमरनाथ गुप्ता, युनियन बँक ऑफ इंडियाच्या पवन नगर शाखेचे शाखाप्रमुख श्री यशवंत वाघ, नाशिक शहर शाखाप्रमुख श्री तुषार चौरागडे, जितेंद्र सोनवणे श्रीकांत पाटील किशोर पाटील, परमजीत सिंग ऋषी सिंग, मंगेश टिकार उपस्थित होते.
याप्रसंगी सौरभ अग्रवाल यांनी बँकेच्या विविध उत्पादनांची माहिती दिली शिवाय बँकेचे व्योम ॲप वापरून 350 पेक्षा जास्त सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात बँकेतर्फे ग्राहकांना क्यू आर कोड चे वाटप करण्यात आले जेणेकरून डिजिटल देवाण-घेवाण सोपी होईल. युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः भाजीपाला खरेदी करून डिजिटल माध्यमातून त्याचे पेमेंट केले. श्री सौरभ अग्रवाल यांनी बँकेच्या इतरही योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आवाहन केले. सुधाकर बडगुजर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून सर्व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय सर्व भाजीपाला विक्रेते आणि नागरी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.
युनियन बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असून बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रात विशेष कार्य केलेले आहे. डिजिटल बँकिंग मधील पुढचे पाऊल म्हणून युनियन बँक ऑफ इंडिया ने आज रोजी पवन नगर येथील जिजामाता मंडी येथे डिजिटल बँकिंग व्यवहार सुरू केले. यापुढे कुठलाही विक्रेता डिजिटल व्यवहाराद्वारे देवाण-घेवाण करू शकणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर तथा सुनील पाटील, भाऊसाहेब नारायणे हे उपस्थित होते युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक सौरभ अग्रवाल उपक्षेत्रीय प्रबंधक अमरनाथ गुप्ता, युनियन बँक ऑफ इंडियाच्या पवन नगर शाखेचे शाखाप्रमुख यशवंत वाघ, रवी कुवर, रिशी सिंग, निलेश गवळी, पवन वाघ नाशिक शहर शाखाप्रमुख श्री तुषार चौरागडे, जितेंद्र सोनवणे, श्रीकांत पाटील, किशोर पाटील, परमजीत सिंग ऋषी सिंग, मंगेश टिकार उपस्थित होते.
याप्रसंगी सौरभ अग्रवाल यांनी बँकेच्या विविध उत्पादनांची माहिती दिली शिवाय बँकेचे व्योम ॲप वापरून 350 पेक्षा जास्त सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात बँकेतर्फे ग्राहकांना क्यू आर कोड चे वाटप करण्यात आले जेणेकरून डिजिटल देवाण-घेवाण सोपी होईल. युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः भाजीपाला खरेदी करून डिजिटल माध्यमातून त्याचे पेमेंट केले. सौरभ अग्रवाल यांनी बँकेच्या इतरही योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आवाहन केले, श्री सुधाकर भाऊ बडगुजर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून सर्व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या शिवाय सर्व भाजीपाला विक्रेते आणि नागरी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.