सातपूर/एनजीएन नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगात उंचावलेली भारताची प्रतिमा आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झंझावात या सर्व विषयांना प्रेरित होऊन आज सातपूर येथील विविध मंडळ व युवकांनी भाजप नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या अध्यक्षतेत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
प्रवेशकर्त्या संघटना आणि कार्यकर्त्यांत वक्रतुंड युवा प्रतिष्ठान श्रमिक नगर, हिंदुत्व युवा फाउंडेशन बळवंत नगर, शिवरुद्र ग्रुप सोमेश्वर कॉलनी, राजदूत सामाजिक मंडळ, नाशिक तसेच सागर वैष्णव, जगदीश गांगुर्डे, मुन्ना यादव, सोनू शेख यांचा समावेश आहे. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्रवेशकर्त्यांना ८९८०८०८०८० या क्रमांकावर मिसकॉल करून प्राथमिक सदस्य करून घेण्यात आले. यावेळी भाजप शहर सरचिटणीस जगन आण्णा पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, शहर सचिव संतोष नेरे, हर्षा फिरोदिया, क्रीडा आघाडी संयोजक राकेश पाटील, सातपूर सरचिटणीस चारुदत्त आहेर, वसंत उशीर, राहुल बोरादे आदी पदाधिकारी उपास्थित होते