नाशिक/एनजीएन नेटवर्क
सुप्रसिद्ध लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या देवकी प्रदीप कुलकर्णी यांच्या ‘मंथनामृत’ पुस्तकाचे प्रकाशन येत्या २६ ऑगस्ट ( शनिवारी) रोजी होणार आहे.
गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक सभागृहात ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजता आयोजित या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुलकर्णी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.