NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

रेडक्रॉसच्या स्तनपान सप्ताहात बाळाच्या परिवारासाठी प्रात्यक्षिके सादर

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

 नवजात बालकांच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात बाळांच्या आई बरोबरच  कुटुंबीयांची भूमिका तेवढीच महत्वाची आहे. बाळाला किमान पावणेदोन ते दोन वर्षे योग्यरित्या स्तनपान दिल्यास अशा बाळांची प्रतिकारशक्ती उत्तम राहाते असे प्रतिपादन रेडक्रॉसच्या डॉक्टरांनी केले.

१ ते ७ ऑगस्ट दरम्यान आयोजित जागतिक स्तनपान सप्ताहाच्या सांगता समारंभामध्ये सर्व स्तरांतील परिवारांसाठी स्तनपान : समज – गैरसमज विषयावर  प्रात्यक्षिक व जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रेडक्रॉस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा औंधकर आणि बालरोगतज्ज्ञ डॉ.नितीन बिर्ला यांनी बाळाला सुयोग्य स्तनपान देण्याच्या प्रात्यक्षिकांबरोबरच  माता- पित्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. यावेळी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या कांचन ढेरींगे यांना विशेष पारितोषिक देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयश्री कुलथे, मंगला कस्तुरे , सिस्टर पुष्पांजली, गार्गी डगळे, चंद्रकांत गोसावी,  प्रयत्नशील होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.