NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्थेतर्फे दीपस्तंभ पुरस्कार प्रदान

0

 पंचवटी/एनजीएन नेटवर्क

 शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्थेचे ,यजुर्वेद मंदिरातील , कै सौ बिंदू रामराव देशमुख सभागृहात ऋषीपंचमीनिमित्त ऋषीपूजन करून आदर्श व्यक्तिमत्वांचा दीपस्तंभ पुरस्कार सन्मानाने संपन्न करण्यात आला. महंत रामकिशोरदास शास्त्री, अखिल भारतीय श्रीपंच दिगंबर अनिआखाडा प्रमुख यांचे ऋषीपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे हे १७ वे वर्ष होते. याप्रसंगी २१ आदर्श व्यक्तिमत्वांचा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ‘सावाना’ अध्यक्ष प्रा. दिलीप फडके आणि उद्योजिका शरयू देशमुख हे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह ऍड भानुदास शौचे, उपाध्यक्ष अनिल देशपांडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन , गणेशोत्सव समिती प्रमुख अवधूत कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

   प्रारंभी कार्याध्यक्ष तुषार जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले . मान्यवरांचे हस्ते मंत्रघोषात दीपप्रज्वलन व महर्षी याज्ञवल्क्य यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सतीश शुक्ल,  पं वैभव दीक्षित , पं रवींद्र देव , पं उपेंद्र देव ,यांनी मंत्रघोष केला. यावेळी दिवंगत आदर्श व्यक्तिमत्वाच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्याचे निवेदन उपेंद्र शुक्ल यांनी केले. दिवंगत आदर्श व्यक्तींच्या वारसांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ऋषीपूजन व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष, कार्याध्यक्ष , कार्यवाह यांनी केला. कार्यवाह ऍड भानुदास शौचे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर उदय जोशी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. महंत रामकिशोरदास शास्त्री , प्रा दिलीप फडके, उद्योजिका सौ शरयू देशमुख, अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कार मूर्तींचा परिचय सुहास भणगे , धनंजय पुजारी ,पं वैभव दीक्षित,राजन कुलकर्णी, अनिल देशपांडे ,सौ रत्नप्रभा गर्गे , सौ मंजुषा पुजारी यांनी करून दिला. सर्व सत्कार मूर्तींचे वतीने प्रा शिरीष गंधे यांनी सत्काराला उत्तर दिले. सौ राजश्री  शौचे यांनी आभार मानले , सौ रोहिणी कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

   कार्यक्रमासाठी अध्यक्ष सतीश शुक्ल , उपाध्यक्ष अनिल देशपांडे  कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह ऍड भानुदास शौचे , कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन ,प्रमोद मुळे , महेंद्र गायधनी , राजन कुलकर्णी पं रवींद्र देव , पं वैभव दीक्षित ,  ,  अवधूत कुलकर्णी , डॉ शरद कुलकर्णी , सुहास भणगे , रामकृष्ण उपासनी, ज्ञानेश देशपांडे, सौ अनिता कुलकर्णी , दीपक कुलकर्णी, सौ शांता जाधव, गजानन जाधव यांनी परिश्रम घेतले.

   याप्रसंगी दिवंगत आदर्श व्यक्तीमत्त्वांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यामध्ये 1) कै. राधाबाई मुरलीधर अंधृटकर, 2) कै. मुरलीधर नारायण अंधृटकर, 3) कै. अशोक वामनराव कुलकर्णी, 4) कै. बाळकृष्ण महादेव पंडित, 5) कै. सिंधूताई बाळकृष्ण पंडित, 6) कै. हरिषचंद्र (आबा) देशमुख 7) कै. दामोदर महादेव चंद्रात्रे 8)कै.शामराव नथु पंडित 9)कै.उषा वसंत पाराशरे 10)कै लता रमेश इंगे यांचा समावेश राहिला.

     ——  ——  ——-

दिपस्तंभ पुरस्कार सन्मान सत्कारमूर्ती

  1) ज्योतिर्विद कमलाकर रघुनाथ देशपांडे (ज्योतिष, नाशिक) 2) वे. त्र्यंबक सदाशिव शुक्ल (बाबुराव शुक्ल) (त्र्यंबकेश्वर पौरोहित्य, शेती) 3) श्री. किशोर पुरुषोत्तम फडे, (जेष्ठ पत्रकार) 4) डॉ. संजय वसंत लऊळ (नेत्र रोग तज्ञ, नाशिक.) 5) डॉ. मिलिंद देविदास देशमुख (त्वचारोग तज्ञ, नाशिक) 6) डॉ. सदानंद वासूदेव नायक (त्वचारोग तज्ञ, नाशिक)  7) वे.मु. सुरेश रामचंद्र शिंगणे (याज्ञीक पौरोहित्य, नाशिक) 8) श्री. विनोद कृष्णराव जोशी (राजकीय, शेती, देवगाव) 9) प्रा. शिरीष श्रीकृष्ण गंधे, (लेखक, कवी, संत साहित्य अभ्यासक. लासलगाव) 10) प्रभाकर दत्तात्रय कुलकर्णी, (शैक्षणिक, नाशिक) 11) श्रीराम दत्तात्रय महाजन, (सामाजिक, सांस्कृतिक, नाशिक) 12) ऍड. मिलिंद मधुकर चिंधडे वकील (साहित्यिक, नाशिक )13) श्री. सतीश मधुकर मुळे (सामाजिक, सिन्नर) 14) पांडुरंग(बापू) यशवंत मांडवडकर (प्रशासन (निवृत्त) येवला) 15) श्री. पुरुषोतम गोपाळ जोशी (राजू जोशी) (सामाजिक, कार्याध्यक्ष मालेगाव कॅम्प ब्राह्मण संघ, मालेगाव) 16) आजित मधुकर चिपळूणकर (सामाजिक, नाशिक) 17) श्री. संजय सुधाकर पुजारी (श्रीकाळाराम कीर्तन संस्था, कार्यवाह) 18) श्री. रमेश नारायण गायधनी (आदर्श व्यक्तिमत्त्व) सत्कारमूर्तींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला

सत्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, सन्मानपत्र, महर्षि याज्ञवल्क्य प्रतिमा, शाल, हार, श्रीफळ असे होते. सौभाग्यवतींना शाल , ओटी , गजरा याने सन्मानित करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.