NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर; बचावकार्य अव्याहत सुरू

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर अजूनही बचावकार्य सुरू असून आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. शिंदे यांनी घटनस्थळी भेट देऊन आल्यानंतर तिथली परिस्थिती सांगितली.

  दुर्घटनेबाबत निवेदन करताना शिंदे म्हणाले, खालापूरजवळील इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री ११.३५ दरड कोसळली होती. तातडीने तिथे बचाव पथक पाठवली होती. आपली यंत्रणा १२.४० वाजता घटनास्थळी पोहोचली होती. घटनास्थळी एनडीआरएफच्या चार टीम पोहोचल्या. स्थानिक बचाव पथकाच्याही पाच टीम आहेत. घटनेची माहिती मिळताच मी, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे हे तत्काळ रात्री निघालो होतो. रात्री तीन वाजता घटनास्थळी पोहोचलो होतो. रात्रीच्या स्थिती होती आणि उंच डोंगर होता. सकाळी पोहोचल्यावर त्यांना बाहेर काढणे ही महत्वाची कामगिरी होती. त्यातच दुर्दैवाने तिथे यंत्र पोहचवण्याची परिस्थिती नव्हती. शिवाय ते दरड प्रवण गाव नव्हते. गावातील सर्व लोकांची तातडीची व्यवस्था शाळेत केली आहे. आता ५० ते ६० कंटेनर मागवले आहेत. सध्या ३० कंटेनर उपलब्ध झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

निर्वासित झालेल्या लोकांची कायमची व्यवस्था कऱण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यांच्यासाठी जागा निश्चित केली असून सिडकोलाही सांगितले आहे. त्यांना आवश्यक सुविधा देण्याच्या सूचना केल्या आहेत. आज कॅबिनेटमध्ये देखील अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी लोकांना शिफ्ट करण्यासाठी धोरण निश्चित केल्याचे शिंदेंनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.