NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गरोदर महिला मृत्यू प्रकरण विधिमंडळात; अधिकाऱ्यांकडून पाहणी

0

घोटी/राहुल सुराणा

इगतपुरी तालुक्यातील जुनवणे वाडी येथील गरोदर महिलेचा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे उपचाराला विलंब झाल्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनातील हा प्रश्न चांगलाच गाजला. या प्रश्नावर विरोधक व सरकारमध्ये चर्चा झाली. दरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांनी याबरोबरच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी जुनवणेवाडी या ठिकाणी भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली.

       दरम्यान कालच्या घटनेचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान एल्गार कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज इगतपुरी पंचायत समितीवर सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढन्यात काढण्यात आली.

         जुनवनेवाडी तालुका इगतपुरी येथे परवा पहाटे वनिता भाऊ भगत या 23 वर्षे गरोदर महिलेचा मृत्यू झाला. उपचारासाठी रात्रीच्या वेळी जात असताना पायपीट करावी लागल्याने त्यात उपचाराला विलंब झाल्याने या गरोदर मातेचा आपला जीव गमवावा लागला. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. आज सकाळीच गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांच्यासह मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, बालकल्याण विभागाचे अधिकारी जिल्हा परिषदेचे अधिकारी, आदिवासी एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी आदींनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली व रस्त्याबाबत करावयाचे उपायोजना याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली 

    याबरोबरच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही या प्रश्न अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून या भागातील रखडलेल्या रस्त्यांची कामे तातडीने मार्गे लावून या महिलांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

———

       दरम्यान एल्गार कष्टकरी संघटनेनेही शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत पंचायत समिती कार्यालयावर सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली तसेच पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांच्यासह आणि ग्रामस्थ व महिलांनी यात सहभाग घेतला. शहरी भागात कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यांसह मूलभूत सुविधा पुरवल्या जातात मात्र आदिवासी भागात जाचक अटींचा बाऊ करत रस्ते व मूलभूत सुविधांकडे सरकार दुर्लक्ष करते. त्यामुळे अशा घटना घडतात आता तरी शासनाने जागे होऊन या वाडीचा रस्ता तात्काळ करावा अन्यथा एल्गार कष्टकरी कामगार संघटना याबाबत सातत्याने लढा देईल असा इशारा देऊन संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले.

——–

      विधिमंडळाचे आज विधिमंडळात हे आज या घटनेचे पडसाद उमटले सत्ताधारी व विरोधक यांच्यात या प्रश्नावर चर्चा झाली. विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले माजी मंत्री वर्षा गायकवाड आदींनी हा प्रश्न विधानसभेत लावून धरला. आदिवासी भागात विकास काम करताना सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते शासनाने आदिवासी डोंगराळ भागात विकासासाठी निधी पुरवला असता तर आज ही वेळ आली नसती अशा शब्दात सरकार वर ताशेरे ओढले. तर सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार याबाबत निश्चितपणे सभागृहात निवेदन करेल असे नमूद केले. शासन दरबारी दखल घेतली तर जुनवने वाडीसह अशा अनेक दुर्लक्षित वाडी, वस्तीवरील रस्ते व मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.