पुणे/एनजीएन नेटवर्क
प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांचे निधन झालं आहे. १९८० चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही.
मावळच्या तळेगाव दाभाडील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होते. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे, हे खूपच वेदनादायी आहे. अभिनेत्री परवीन बाबी हिचा देखील अशाप्रकारे शेवट झाला होता.
करिअरची सुरुवात टॅक्सी चालक म्हणून..
‘मुंबईचा फौजदार’, ‘झुंज’, ‘कळत नकळत’, ‘आराम हराम’ अशा कितीरी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका सुपरहिट झाल्या. परंतु, मराठीतील या एव्हरग्रीन अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात चक्क टॅक्सी चालवून केली होती. हे फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊयात.अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी रविंद्र महाजनी खरोखर एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी जवळपास तीन वर्षे त्यांनी मुंबईत टॅक्सी चालवली. पण, त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. आणि, रात्री टॅक्सी चालवत.