NGN News
Latest Marathi News

‘श्याम हेवन’ च्या गणरायाची आरती पोलीस उपायुक्त खांडवी यांच्या हस्ते

नाशिक : विकास पाटील

श्याम हेवन अपार्टमेंटच्या गणरायाची आरती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाच्या वतीने रोजच विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमात सर्व जातीत धर्माचे लोकसभा घेतात तसेच मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्या अनुषंगाने गणरायाच्या आरतीसाठी खांडवी यांना आमंत्रित करण्यात आले.

त्यांच्या हस्ते गण रायाची आरती तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल पारितोषिक वितरित करण्यात आले त्यावेळेस माननीय खांडवी साहेबांनी परिसरातील नागरिकांची सुरक्षेबाबत संवाद साधला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व श्याम हेवन अपार्टमेंटचे सर्व सभासद उपस्थित होते

Comments are closed.