बंगळुरू /एनजीएन नेटवर्क
सध्या अशा एका लग्नाची चर्चा सुरु आहे जिथे किमान खर्चात कमाल आनंदाचे क्षण अनुभवल्याचे पाहायला मिळाले. हा लग्नसोहळा होता खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या घराच अर्थात त्यांच्या लेकिचा. सितारमण यांच्याच घरी त्यांच्या लेकिनं लग्नगाठ बांधली. यावेळी मित्रपरिवार आणि जवळच्या नातेवाईकांची उपस्थिती पाहायला मिळाली. बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या या विवाहसोहळ्यासाठी कोणत्याही राजकीय चेहऱ्याची उपस्थिती पाहायला मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सितारमण यांच्या मुलीचा म्हणजेच परकला वांगमयी आणि प्रतीक यांचा विवाह ब्राह्मण पद्धतीने पार पडला. जिथे उड्डपी अदामारू मठाच्या संतमंडळींनी नवविवाहित दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. लग्नसोहळ्याच्या वेळी ज्याप्रमाणे सर्वसामान्य वधुवरांवरच सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात अगदी तसंच इथंही झाल्याचं पाहायला मिळाले. जिथे वधुनं पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीची साडी, नेसली होती तर वराने पांढऱ्या रंगाचा पंचा आणि परिधान केला होता. यावेळी लेकीच्या लग्नाच्या वेळी निर्मला सितारमण यांनीसुद्धा मोलाकलमुरु साड़ी नेसल्याचं पाहायला मिळाले.