NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

इगतपुरीतील धरणांची ‘शत-प्रतिशत’ साठ्याकडे वाटचाल; विसर्ग सुरु..

0

घोटी /राहुल सुराणा

जिल्ह्यातील पाण्याचे आगार असलेल्या इगतपुरी तालुक्यात पश्चिम भागात पावसाचे सातत्य असल्याने तालुक्यातील जवळपास सर्वच धरणाचा साठा १०० % कडे सरकत असून त्यात भावली धरण १०० % भरलेले आहे. त्यामुळे दारणा , भावली व कडवा धरणातून चांगल्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.      

इगतपुरी तालुक्यात पावसाचे सातत्य असल्याने मागच्या वर्षाच्या तुलनेत उशिरा का होईना परंतु धरणाचा साठा वाढत आहे व भावली व दारणा धरण भरले असून पाण्याचा विसर्ग पुढे सरसावत आहे. कडवा धरणात सुद्धा समाधानकारक साठा झाला असून त्यातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यातील पश्चिम भागात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे भात आवणीचे कामे पूर्ण झाली आहे व काही ठिकाणी होण्याच्या मार्गावर असून तालुक्यातील पूर्व भागात मात्र पावसाचे प्रमाणात कमी असल्याने आतापर्यंत ६० % भात आवनी झाली आहे. पूर्व भागात चांगल्या व दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजा करत असून जुलै महिना संपला असून उर्वरित वेळेत कसा पाऊस होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

  रविवारी ३० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तालुक्यात ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून आजपर्यत २०२२ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच  ५८% पाऊस झाला आहे. मुंबई ला पाणी पुरवठा करणाऱ्या तालुक्यातील वैतरणा धरणात सुद्धा समाधानकारक पाऊस झाला असून ६५ % च्या वर धरणात उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे असाच जर पाऊस राहिला तर लवकरच वैतरणा धरण ओसंडून वाहील . 
आकडेवारी :- 
रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणाचा साठा (दलघफू ) , टक्केवारी(%)  , झालेला आजचा पाऊस(मिमी) , एकूण पाऊस (मिमी ) विसर्ग (क्यूसेस) 
दारणा       ५५८६      ७८. १४%           १५                  ५१७              १२५०भावली        १४३४     १००                    ४८                २२९४              २९०मुकणे         ४९१२      ६७. ८५             २१                     ५७५भाम           २१२२        ८६. १२            ३६                   १२४३कडवा           १३०२     ७७. १३             १०                     ४१५               ६७२वाकी           १०९४       ४२. ९०            ३०                   ९४७वैतरणा         ७७००     ६५. ८०           ४३                    १४६१   

Leave A Reply

Your email address will not be published.