मुंबई/एनजीएन नेटवर्क
अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंत्रालयात आंदोलन केले. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याने तसेच घेराव घालताना धक्काबुक्की झाल्याने काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, १९७२ साली झालेल्या प्रकल्पाचा योग्य मोबदला न मिळल्याने हे प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी गेल्या १०३ दिवसांपासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु होतं. मात्र, या आंदोलनाची सरकारनं दखल न घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उद्यापर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळ्यांवर या आंदोलकांनी उड्या घेतल्या. त्यांना वाचवण्यासाठी काही पोलीस कर्मचाऱ्यांनीही उड्या घेतल्या. यामुळं मोठ्या गोंधळ निर्माण झाला होता.