नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणी अर्थात काँग्रेस वर्किंग कमिटी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 39 सदस्यांचा समावेश असलेल्या या यादीत महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, चंद्रकांत हंडोरे, रजनी पाटील, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांसारख्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या यादीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना डच्चू देण्यात आला आहे.
सदर यादीमध्ये सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांसह दिग्गजांचा समावेश आहे. याशिवाय, मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, एके अँटनी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंह, चरणजीत सिंह चन्नी, आनंद शर्मा यांच्यासह एकूण 39 नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय 32 स्थायी निमंत्रित, 9 विशेष निमंत्रित, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि सेवादल अध्यक्षांनाही या कमिटीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. काँग्रेस कार्यकारिणीत सचिन पायलट, शशी थरूर, अशोक चव्हाण, दीपक बावरिया यांच्या रूपाने नवी नावे पुढे आली आहेत. गौरव गोगोई, नासिर हुसेन, दीपा दास मुन्शी हेदेखील यादीत समाविष्ट आहेत. निमंत्रितांमध्ये पवन खेरा, सुप्रिया श्रीनाटे आणि अलका लांबा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील सदस्य असे :
- मुकुल वासनिक
2. अशोकराव चव्हाण
3. अविनाश पांडे (महासचिव म्हणून)
4. रजनीताई पाटील (प्रभारी)
5. माणिकराव ठाकरे (प्रभारी)
कायम निमंत्रित :
6.चंद्रकांत हंडोरे
विशेष आमंत्रित :
7. प्रणिती शिंदे
8. यशोमती ठाकूर