नवी मुंबई/एनजीएन नेटवर्क
सीमाशुल्क विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मयंक सिंग या अधिकाऱ्याच्या घरावर दोन दिवसांपूर्वी सीबीआयने छापा टाकला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोज सिंह यांनी नवी मुंबईतील तळोजा तलावात उडी मारून आपले आयुष्य संपवले.
सीबीआयने मयंक सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी मयांक यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. मयंकने लाच घेऊन सीमा शुल्क विभागातील प्रलंबित असलेली दोन बिले मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अधिकारी मयंक सिंग यांच्या आत्महत्येनंतर खारघर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिकाऱ्याच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कस्टमने जप्त केलेले माल सोडण्यासाठी त्याच्या वरिष्ठांकडून दबाव आणल्याचा उल्लेख आहे. या सुसाईड नोटमध्ये तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.