NGN News
Latest Marathi News

इगतपुरीत गोहत्येविरोधात वज्रमूठ; वसुबारसला गोरक्षण सभेचे आयोजन

  • छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

** विक्रम पासलकर

गोंदे दुमाला : एनजीएन न्यूज नेटवर्क

 दिवाळीच्या पवित्र वसुबारस दिनी, गोमातेच्या रक्षणासाठी आणि गोहत्येविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने इगतपुरी तालुक्यात एक भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा भवानी माता मंदिर, बेलगाव – कुर्हे रोड येथे होणार असून, गाईचे पूजन करून गोमातेच्या रक्षणाचा संकल्प घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सभेमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज्य पक्ष जिल्हा प्रमुख डॉ. रुपेश नाठे यांनी केले आहे.

सदर सभा बेलगाव परिसरात नुकत्याच घडलेल्या गोहत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. विशेषतः या प्रकरणात काही आरोपी हिंदू समाजातील असल्याने तालुकाभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सभेमध्ये सरकार दरबारी गोमातेच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आवाज उठवण्यात येणार आहे. सभेसाठी संभाजीराजे छत्रपती, आ हिरामण खोसकर, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे, छावा संघटनेचे संस्थापक करण गायकर, मनोज जरांगे पाटील यांचे मुख्य सहकारी व राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक गंगाधार काळकुटे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव, मविप्र संचालक संदीप गुळवे, निवृत्ती जाधव, भाऊलाल तांबडे , ह भ प देवीदास वारुंगसे, शिवा अडके यांसह मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

Comments are closed.