NGN News
Latest Marathi News

२.९९ लाख हेक्टरवरील पिकांची माती, सव्वाचार लाख शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे

  • जिल्ह्याची सप्टेंबरमधील आकडेवारी समोर
  • नुकसानग्रस्तांचे डोळे प्रत्यक्ष मदतीकडे

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झालेय, याची आकडेवारी अखेर समोर आली आहे. त्यानुसार, दोन लक्ष, ९९ हजार ८०७ हेक्टरवरील पिकांवर अतिवृष्टीने घाला घातल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या चार लाख २७ हजार ५८० असल्याचे आकडेवारी सांगते.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिके, घरे, जनावरे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ग्रामीण भागात याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त भरपाईसाठी ३२८.६७ कोटींची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व पंधरा तालुक्यांत पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्व प्रत्यक्ष मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता तिकडे लागले आहे.

मदतीचे स्वरूप असे :

शेतीपिकांसाठी तीन हेक्टरपर्यंत मदत

जिरायत ( प्रतिहेक्टरी ) : १८.५००

बागायत ( प्रतिहेक्टरी ) : २७,०००

फळपिक ( प्रतिहेक्टरी ) : ३२,५००

खरवडलेली जमीन ( प्रतिहेक्टरी ) : ३.४७ लाख

Comments are closed.