- आधुनिक कुटुंबांसाठी टिकाऊ व कार्यक्षम वॉटर हिटिंग देणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अप्लायन्सेस जीवनशैलीचे विस्तारीकरण बनत असताना खरी नाविन्यता त्यांच्या डिझाइन्समध्ये आहे, ज्यामधून कार्यक्षमता मिळण्यासोबत दैनंदिन राहणीमान अधिक उत्साहित होते. क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. या भारतातील ग्राहक इलेक्ट्रिकल्समधील विश्वसनीय कंपनीने नवीन सोलारियम ब्लेझ लाँच केला आहे, ज्यामध्ये आकर्षक गोल्ड मेटलिक फिनिश आणि खास अॅण्टी-स्केल टेक्नॉलॉजी आहे, जी जड पाण्याच्या आव्हानांचे निराकरण करते. स्लीक, कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर आणि समकालीन इंटीरिअर्सना शोभून दिसणाऱ्या प्रीमियम आकर्षकतेसह हे उत्पादन ‘डिझाइन टू इम्प्रेस, बिल्ट टू एण्ड्युर’ आहे, जे आकर्षकता व अभियांत्रिकी क्षमतेला एकत्र आणत भारतातील आधुनिक कुटुंबांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करते, विशेषत: पावसाळ्यादरम्यान, जेथे पाण्याची गुणवत्ता अनिश्चित असते.
आजची कुटुंबं त्यांच्या इंटीअरिअर्सना शोभून दिसण्यासोबत उत्तम कार्यक्षमता देणाऱ्या अप्लायन्सेसची मागणी करतात. भारतातील प्रमुख शहरांमध्ये झपाट्याने शहरीकरण होत असताना बोअरवेल पाण्यावर अवलंबन देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्यामुळे दैनंदिन वापरामध्ये जड पाण्याचे आव्हान वाढत आहे. जलस्रोतामधील या बदलामुळे घराघरांमध्ये जड पाण्याचा वापर होणे सामान्य झाले आहे, जेथे अप्लायन्सेसवर, विशेषत: वॉटर हिटर्समध्ये उच्च प्रमाणात खनिज जमा होते. यामुळे काळासह हिटिंग कार्यक्षमता कमी होते, वीजेचा अधिक वापर होतो आणि वारंवार देखभाल खर्च होतो. ही वाढती समस्या ओळखत क्रॉम्प्टनने सोलारियम ब्लेझ विकसित केले आहे, ज्यामध्ये हिटिंग घटकावर विशेष डिझाइन करण्यात आलेले अॅण्टी-स्केल कोटिंग आहे, ज्यामुळे हा वॉटर हिटर जवळपास २००० पीपीएमपर्यंत टीडीएस लेव्हल असलेल्या जड पाण्यामध्ये वापरासाठी अनुकूल आहे. हे सोल्यूशन हिटिंग कार्यक्षमता वाढवते, तसेच स्केल जमा होणे कमी करते, ज्यामळे हिटिंग घटकाचा टिकाऊपणा वाढतो आणि सतत सर्विसिंग करण्याची गरज न भासता सातत्यपूर्ण वापराची खात्री मिळते. याव्यतिरिक्त, या वॉटर हिटरची आकर्षक डिझाइन आधुनिक घरांमध्ये विनासायासपणे सामावून जाते, ज्यामधून उपयुक्तता आणि व्हिज्युअल आकर्षकता मिळते.
या नाविन्यतेमधून क्रॉम्प्टनचा वॉटर हिटर्समध्ये उद्देशपूर्ण डिझाइन आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेवरील फोकस दिसून येतो, जो सोलारियम ब्लेझच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. या वॉटर हिटरची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
· अॅण्टी-स्केल टेक्नॉलॉजी: जड पाण्यामध्ये टिकून राहण्यासाठी सुसज्ज हे तंत्रज्ञान गाळ आणि स्केल जमा होण्यास प्रतिकार करण्यास मदत करते. गाळ व स्केल जमा होणे ही बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागात आणि विशेषतः टीडीएसची पातळी वाढणाऱ्या पावसाळ्यात सामान्य समस्या आहे. हे तंत्रज्ञान हिटिंग कार्यक्षमता राखण्यास मदत करते, वारंवार सर्विसिंगची आवश्यकता कमी करते आणि उत्पादनाचे आयुष्य वाढवते.
· प्रीमियम आकर्षक डिझाइन: आधुनिक बाथरूम आणि किचन्सना पूरक म्हणून विचारपूर्वक डिझाइन केलेल्या या उत्पादनाचे आकर्षक व टिकाऊ फिनिशिंग जागेची आकर्षकता वाढवते, तसेच गंजमुक्त डिझाइन विशेषत: पावसाळ्यात हंगामी आर्द्रता व ओलाव्यामध्ये टिकून राहण्यासाठी तयार करण्यात आली आहे. मॉडेलमध्ये वाइड-अँगल एलईडी इंडिकेटर देखील आहे, ज्यामुळे इंडिकेटर डिझाइनचा विस्तृत आणि तेजस्वी प्रसार पाहता सर्व कोनातून वॉटर हिटरची स्थिती पाहणे सोपे होते.
· ३ केडब्ल्यू पॉवर वॅटेज: त्वरित वॉटर हिटिंग देते, ज्यामुळे थंड वातावरणात किंवा पावसाळ्यामध्ये गरम पाणी आवश्यक असताना त्वरित वापरासाठी अनुकूल आहे. उच्च वॅटेजमधून पावसाळ्यादरम्यान पाण्याच्या तापमानात चढ-उतार होत असताना देखील सातत्यपूर्ण कार्यक्षमतेची खात्री मिळते.
· ३ लीटर क्षमता: कॉम्पॅक्ट शहरी घरांसाठी पूर्णपणे योग्य, ३-लीटर क्षमतेचे हे उत्पादन किचन किंवा बाथरूमच्या जलद गरजांसाठी पुरेसे गरम पाणी पुरवते, ज्यामुळे वापरकर्त्यांना दैनंदिन कामांमध्ये कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासोबत वीज बचत करण्यास मदत होते.
· वॉरंटी हमी: हिटिंग घटकावर ६ वर्षे, टाकीवर ५ वर्षे आणि एकूण उत्पादनावर २ वर्षे, ज्यामधून विशेषत: जड पाणी आणि हंगामी ओलावा-संबंधित पोशाखांचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठी टिकाऊपणाप्रती क्रॉम्प्टनची कटिबद्धता दिसून येते.
नवीन लाँचबाबत मत व्यक्त करत क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि.च्या लार्ज डॉमेस्टिक अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष मल्हार वडके म्हणाले, ”आजच्या कुटुंबांची आव्हानात्मक स्थितींमध्ये विश्वसनीय कामगिरी करू शकणाऱ्या, तसेच त्यांच्या आधुनिक जीवनशैलीशी पूरक असलेल्या अप्लायन्सेसची मागणी आहे. सोलारियम ब्लेझसह आम्ही डिझाइन कौशल्य आणि शक्तिशाली अॅण्टी-स्केल टेक्नॉलॉजीला एकत्र आणले आहे, जे विशेषत: पावसाळ्यादरम्यान जड पाण्याच्या वाढत्या समस्येचे निराकरण करते. कार्यक्षम हिटिंग व दीर्घकालीन टिकाऊपणा देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले हे उत्पादन प्रीमियम आकर्षकता देखील देते, जे समकालीन इंटीरिअर्समध्ये विनासायासपणे सामावून जाते. या लाँचमधून अर्थपूर्ण नाविन्यतेवर क्रॉम्प्टनचा फोकस दिसून येतो, जे दैनंदिन समस्यांचे निराकरण करते आणि एकूण वापरकर्त्यांचा अनुभव उत्साहित करते.”
देशभरात क्रॉम्प्टन अधिकृत रिटेल आऊटलेट्स आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेला सोलारियम ब्लेझ त्वरित हिटिंग, अॅण्टी-स्केल संरक्षण व प्रीमियम डिझाइन देतो, जो जड पाणी आणि पावसाळ्यामधील स्थितींमध्ये दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
Comments are closed.